Feed on
Posts
Comments

Archive for the ‘Uncategorized’ Category

शेतकरी चढतो फासावर नको काळजी !
आपणास मिळते ना भाकर, नको काळजी !
पेढ्या, बँका बुडती येथे, बुडेनात का.
स्विस बॅकेतुन ठेवा लॉकर, नको काळजी !
पाच सनांनी भरेल येथे खुर्चिस्वयंवर,
बिज्वर तरिही ठराल उपवर, नको काळजी !
पचतो आहे तोवर पैसा खात रहावे.
होऊन झाले काय आजवर, नको काळजी !
याने केला दावा, त्याने केस ठोकली,
न्यायनिवाडा नाही सत्वर, नको काळजी !
शिमगा येथे [...]

Read Full Post »

एक तारा पेटुनी उठला पुरे..!
वीतभर काळोख विस्कटला पुरे..!
घोषणा, आंदोलने पुढचे पुढे,
भाषणाला येऊनी बसला पुरे..!
कायद्याचा खेळ आम्ही पाहिला
न्याय नाही लाभला; खटला पुरे..!
दर्शनांती देव नाही भेटला
राहिल्या शाबूत या “चपला” पुरे..!
वाहवा त्याला हवी तितकी मिळो.
दाद “एसेमेस”ची मजला पुरे..!
मी स्वतःचे रक्त का सांडू असे ?
हा जरासा हात खरचटला, पुरे..!
देव, देशास्तव समाजास्तव नको
तो स्वतःसाठी जरी लढला पुरे..!
जीवनाचा अर्थ कोणाला हवा [...]

Read Full Post »

पाऊस कधीचा साद घालतोय
जराशी खिडकी उघडा राव..!
आले तर येऊ देत दोन थेंब आत
तेवढाच जरा भिजायला वाव..!
भिजला तर भिजू दे कोट,
उद्या पुन्हा वाळेल ना..!
पण आजचा असाच पाऊस
उद्या पुन्हा मिळेल का ?
आम्ही आपले देतोय म्हणून
खाऊ नका इतका भाव..!
पाऊस कधीचा साद घालतोय
थोडीशीच खिडकी उघडा राव..!
तुम्हाला आपली एकच काळजी
बिघडेल आपली कडक इस्त्री.
पण कधी शोधून पहा ना
धुक्यामधली अनोखी मिस्ट्री..!
एटीकेट आणि [...]

Read Full Post »

पदोपदी बघ चकवा आहे.
किरण तमाहुन फ़सवा आहे.
रांगेमध्येच जीवन सरले
सांग मोजुनी कितवा आहे..!
दोन्ही हातां पाचच बोटे
कसला डावा उजवा आहे..!
त्यांची हृदये ‘दगडी’ झाली
मजला म्हणती हळवा आहे..!
अरे किनार्‍यासाठी नाही,
लाटांसाठी मचवा आहे.
मिठी मारण्याआधी खाना,
कमरेला बघ बिचवा आहे ?
ठिणगी ज्याला आज समजता,
तोच उद्याचा वणवा आहे.
आम्ही नक्की स्वतंत्र झालो,
की ही अजुनी अफ़वा आहे..!
– अभिजीत दाते

Read Full Post »

कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले.
दान दिले पण परताव्याचे योग ठेवले.
पाणी आता साधन झाले लढण्यासाठी,
पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले.
दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही.
रोज पार्वती अन तुलसीचे “सोप” ठेवले.
विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण,
छातीवरती तलवारीचे टोक ठेवले.
देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला.
गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले.
चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली.
हिशोब होते मीही ऐसे “चोख” ठेवले..!
– [...]

Read Full Post »

बरं झालं असतं “ओएसओ” जर बघितला नसता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..
डोळ्यांमधल्या अजब अदा राहून राहून छळतात.
दिलाचे पतंग आणि किती श्वासावरती जळतात.
जग सुनं सुनं होतं पिक्चर सरता सरता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..
युवराजसोबत फ़िरते ती अन ढोणीसोबत दिसते.
क्रिकेटमधले तिला सांगा नक्की किती कळते !
क्रिकेट,बॉलीवुड तेवढंच खरं बाकी गोंधळ नुसता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..
या जन्मी [...]

Read Full Post »

 नूतन वर्षाभिनंदन..!

नमस्कार,
गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा..!
गुढीपाडव्याची आणखी एक आठवण म्हणजे मागच्या वर्षी याच दिवशी या ब्लॉगचा आरंभ झाला. एक गुढीच उभारली म्हणा ना..!  सुदैवाने या उपक्रमाला नेहमीच्या आरंभशूरतेचं ग्रहण लागलं नाही. तुमच्या उमेद वाढवणार्‍या, प्रोत्साहन देणार्‍या प्रतिक्रिया दर वेळी नवीन पोस्ट टाकण्याचं बळ देत राहिल्या. आणि हा हा म्हणता वर्ष उलटलं. प्रत्येक नवीन पोस्ट टाकताना [...]

Read Full Post »

जपत जीवाला ट्रेन सोडणे नामंजूर.
स्लो लोकलची वाट पहाणे नामंजूर.
मी मिळवावी जागा विंडोशेजारची,
दुसरी, तिसरी, चौथी जागा नामंजूर..!
कुपन हवे अन कार्ड हवे मज पास नको.
सुट्ट्या पैशाचाही मजला त्रास नको.
घड्याळ माझे तेच ज्या क्षणी ये गाडी,
मनगटावरी वेळ पाहणे नामंजूर..!
विदाऊट तिकिट जातो पाहून लाईन मी.
टि.सी. धरता मजला भरतो फ़ाईन मी.
प्रवासामध्ये होती हाडे चक्काचूर,
मज गर्दीचे थिटे बहाणे नामंजूर..!
धक्के, बुक्के भांडण [...]

Read Full Post »

सोडुनी द्या मामला हा सेट नाही.
मी तिच्या नजरेत तितका ग्रेट नाही.
वाट बघणे नेहमीचे काम होते
तीच उशिरा, मी कधीही लेट नाही.
ती म्हणाली जाऊ जोधा अकबराला.
पाहिला मी अजुन “जब वी मेट” नाही.
बॅंक बॅलन्स काय आहे काय सांगू,
दुसरा कुणी कवितेविना असेट नाही.
ती परी सुद्धा अता “इतिहास” झाली
खिन्न मी थोडा परी अपसेट नाही.
आडनावातून डी, ए, टी, ई तरिहि,
का मला [...]

Read Full Post »

तिला भिजायची हौस…
मला भिजायची हौस..
त्याला भिजवायची हौस..!
खूप जमतो रंग जेव्हा भेटतात…
ती, मी आणि पाऊस…!

Read Full Post »

कुंद या हवेत दाटलाय गारवा..
मज तरी असा कुठे हवाय गारवा..
हे जळावरी कशास दाटले धुके,
रूप न्याहळीत गुंतलाय गारवा..

लोकरीत अंग सर्व झाकुनी कसा,
आज तो विचारतो कुठाय गारवा..
पांघरून शाल मी सुखात राहिलो
मज कुठे अजून झोंबलाय गारवा ?
रात चंद्रपावलात थांबली तिथे.
सोबतीस आज थांबलाय गारवा..
गारठून एकटे कशास जायचे ?
ये मिठीत बघ पळून जाय गारवा..!
–    अभिजीत दाते

Read Full Post »

पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून,
राजभैय्याची माणसं परवा गेली स्टॉलवर येऊन.
गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली.
मोकळ्या हाती जातील कशी, घरची मात्र वाचली.
गाडी फ़ुटली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले.
तिकिटासाठी म्हणून थोडे पैसे बाकी ठेवले.
कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे.
उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो [...]

Read Full Post »

सरला प्याला झिंग जराशी बाकी आहे.
अजून थोडे दुःख उराशी बाकी आहे.
दिसतो जो मी केवळ वरचा तरंग आहे.
माझे ‘मी’पण खोल तळाशी बाकी आहे.
तुम्ही हव्या तर सुखे आठवा श्रावणधारा,
हिशोब माझा जुना उन्हाशी बाकी आहे.
नैवेद्याचा केला त्यांनी गाजावाजा,
तेच जेवले; देव उपाशी बाकी आहे.
हवी नको ती सुखे तुझ्यास्तव मागून झाली.
अता मागणे काय नभाशी बाकी आहे ?
नको भास्करा किरणांसाठी तुझी [...]

Read Full Post »

ठरवून असं एका दिवसात प्रेम होतं का सुरु ?
ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!
प्रेम असं कागदाच्या तुकड्यावर का मांडतात ?
प्रेम अगं सुगंधासारखं दाही दिशात सांडतात.
स्वच्छंद पाखरासारखं दोघं आभाळभर फिरु..
ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!
कोण म्हणतं या एकाच दिवशी प्रेम होतं व्यक्त ?
पापण्यांच्या पडद्याआड मग दुसरं काय दिसतं ?
सय आली की नकळत कसे डोळे लागतात झरु..
ऐक [...]

Read Full Post »

माझी प्रेमपत्रं म्हणजे तिच्या वडलांची रद्दी…
विडीकाडीपुरता सुटतो रुपया कधी कधी…
माझी प्रेमपत्रं म्हणजे तिच्या आईला टेंशन…
आमच्या वेळी असलं नव्हतं, काय हे नेक्स्ट जनरेशन…
माझ्या प्रेमपत्रांवर मग आजोबांचा नंबर
व्याकरण शुद्धलेखनाच्या निघतात चुका शंभर…
माझ्या प्रेमपत्रांवरती तिच्या आजीची पाळत…
आठवणीने त्यावर गच्चीत घालते पापड वाळत…
माझ्या प्रेमपत्रांमधल्या सुंदर ओळी ढापून,
तिची बहिण मासिकामधून आणते कविता छापून…
माझ्या प्रेमपत्रांसोबत शेवटी तिच्या भावाच्या खोड्या..
पाऊस साचल्या डबक्यामध्ये [...]

Read Full Post »

तुझ्या घरावर कोसळणारा पाऊस माझ्याशी असं का वागतो ?
नुसतं बरसून जाण्यासाठी सुद्धा आसवांची व्हिजिटिंग फ़ी मागतो…
तुझ्या दाराशी रेंगाळणारा वारा माझ्याशी असं का वागतो ?
तुझ्या केसातला मोगराच त्याला नेहमी का लागतो ?
तुझ्या अंगणातला चंद्र माझ्याशी असं का वागतो ?
चांदण्याने जग न्हाताना माझ्या अंगणात काळोख दाटतो .
तुझ्या ओसरीवरचा कंदील तेवढा माझ्याशी ईमान राखतो .
रात संपेपर्यंत मी आणि [...]

Read Full Post »

सोडून सावलीला पळणार मी कितीसा ?
केले तुला वजा तर उरणार मी कितीसा..!
स्वप्नातले उखाणे होते अजून बाकी,
जागेपणी खुलासा करणार मी कितीसा..
कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..
घालून मी मुखवटे फ़िरतो जगात वेड्या,
पाहून चेहरा हा कळणार मी कितीसा..
साथीस कृष्ण नाही गीता कथावयाला,
वारस धनंजयाचा लढणार मी कितीसा..
सारे तुझ्या जगाचे पाळीन कायदे पण,
“अभिजित” वेगळा मग ठरणार मी [...]

Read Full Post »

बरसणे येथे घनांचे बंद होते .
पावसाळे आसवांचे बंद होते .
मी जिथे गेलो फुले वेचावयाला,
उमलणे तेथे कळ्यांचे बंद होते .
धूर का आश्वासनांचा आज नाही ?
कारखाने भाषणांचे बंद होते .
घातला हैदोस होता दानवांनी
नेत्र भोळ्या शंकराचे बंद होते .
तू नको दैवास आता दोष देऊ ,
ओठ त्यावेळी कुणाचे बंद होते ?
दाटले होते जरी डोळ्यात पाणी
दार माझ्या पापण्यांचे बंद होते [...]

Read Full Post »

कोकीळ का न गाई ?
केली कुणी मनाई..
सरला वसंत आणिक
उध्वस्त आमराई..
गोपाळ काल होते
झाले अता कसाई.
पापास भय कशाचे ?
पुण्याहुनी सवाई..
भावास भाव नाही
परकाच येथ “भाई”..
दारूत धुंद पोरे ,
अश्रूत चिंब आई .
आकाश हे तुझ्या की
डोळ्यातली निळाई!
निवडुंग राहिलो मी
अन तू फुलून जाई..
युद्धे नकोत आम्हा
जगणे इथे लढाई.
दिधला दुवा जगाने
“अभिजीत” ही कमाई..!
–    अभिजीत दाते

Read Full Post »


Read Full Post »

Older Posts »