पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी, क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून, राजभैय्याची माणसं परवा गेली स्टॉलवर येऊन. गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जातील कशी, घरची मात्र वाचली. गाडी फ़ुटली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले. तिकिटासाठी म्हणून थोडे पैसे बाकी ठेवले. कारभारणीला घेऊन संगे, बघा आता [...]
Archive for the ‘स्फुटलेखन’ Category
बिहारी कणा.. (कुसुमाग्रजांची क्षमा मागून)
Posted in कविता, विडंबन, स्फुटलेखन on फेब्रुवारी 22, 2008 | 8 Comments »
व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!
Posted in कविता, स्फुटलेखन on फेब्रुवारी 14, 2008 | 2 Comments »
ठरवून असं एका दिवसात प्रेम होतं का सुरु ? ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..! प्रेम असं कागदाच्या तुकड्यावर का मांडतात ? प्रेम अगं सुगंधासारखं दाही दिशात सांडतात. स्वच्छंद पाखरासारखं दोघं आभाळभर फिरु.. ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..! कोण म्हणतं या एकाच दिवशी प्रेम होतं व्यक्त ? पापण्यांच्या पडद्याआड मग दुसरं काय दिसतं ? [...]
माझी प्रेमपत्रं..!
Posted in कविता, स्फुटलेखन on फेब्रुवारी 6, 2008 | 3 Comments »
माझी प्रेमपत्रं म्हणजे तिच्या वडलांची रद्दी… विडीकाडीपुरता सुटतो रुपया कधी कधी… माझी प्रेमपत्रं म्हणजे तिच्या आईला टेंशन… आमच्या वेळी असलं नव्हतं, काय हे नेक्स्ट जनरेशन… माझ्या प्रेमपत्रांवर मग आजोबांचा नंबर व्याकरण शुद्धलेखनाच्या निघतात चुका शंभर… माझ्या प्रेमपत्रांवरती तिच्या आजीची पाळत… आठवणीने त्यावर गच्चीत घालते पापड वाळत… माझ्या प्रेमपत्रांमधल्या सुंदर ओळी ढापून, तिची बहिण मासिकामधून आणते [...]
आज १५ ऑगस्ट ना …!
Posted in कविता, स्फुटलेखन on ऑगस्ट 15, 2007 | 2 Comments »
आज १५ ऑगस्ट ना मित्रा… आनंदाने भरून आलाय ऊर पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर… आज १५ ऑगस्ट ना मित्रा… सांग भारतात स्टेट्स आहेत किती ? असतील पंचवीस तीस आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..! आज १५ ऑगस्ट ना मित्रा… सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ? कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही [...]
पाऊस आलाय….भिजून घ्या..!
Posted in कविता, स्फुटलेखन on जुलै 1, 2007 | १ प्रतिक्रिया »
थोडा मातीचा गंध घ्या थोडा मोराचा छंद घ्या उरात भरून आनंद घ्या.. आलाय पाऊस…..भिजून घ्या बघा समुद्र उसळतोय वारा ढगांना घुसळतोय तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या.. आलाय पाऊस…..भिजून घ्या ऑफ़ीस रोजच गाठत असतं काम नेहमीच साठत असतं मनातून भिजावंसं वाटत असतं मनाची हौस पुरवून घ्या.. आलाय पाऊस…..भिजून घ्या सर्दी पडसे रोजचेच.. त्याला औषध तेच तेच.. प्यायचेच [...]

