भंगलेले स्वप्न सांभाळू कशाला
सांग ना आता तुला टाळू कशाला
मी किनारी काढले आयुष्य तरिही
भेटल्या लाटेवरी भाळू कशाला
काजव्यांची अन् ग्रहांची जेथ सत्ता
मी अशा गगनात रेंगाळू कशाला
घे तुला कोरेच हे काळीज माझे
नाव लिहिण्याला हवी वाळू कशाला
एकट्याने वाट जर चालायची ही
शर्यतीचे कायदे पाळू कशाला
द्याल जर शिक्षा मला माझ्या खुनाची
एकही आरोप फेटाळू कशाला
- अभिजीत दाते


खुपच छान लिहिले आहे
माझ्या साईटचा पत्ता:
१)संपुर्ण मराठी फेसबुक http://www.marathifanbook.com
२)http://www.prashantredkarsobat.in
Too good !!
सुंदर कविता, सुंदर विचार…
Masstch Abhi ! tyaatlya tyaat ‘bhetlya laatevari…’, ‘kaajvyanchi…’, ‘sharyatiche kaayde…’ khaas avadle.
khupach chaan!!!!!!!