ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे मारेकरी भिंती इथे छप्पर कसायासारखे गर्दीत वाटे एकटे, एकांतही छळ मांडतो, अन् चालले झगड्यात या आयुष्य वाया सारखे डोळ्यात या काहीतरी नक्की असे संजीवनी तू पाहिले की वाटते फिरुनी जगायासारखे तेव्हा तुझ्या वचनावरी मी भाळलो होतो जरी होते बहाणेही तुझे, ह्रुदयी जपायासारखे मी जाणतो सरले अता नाते तुझ्या माझ्यातले [...]
Archive for जून, 2011
ओसाड माझे घर…
Posted in गझल on जून 30, 2011 | Leave a Comment »
एखादा तरी..
Posted in गझल on जून 6, 2011 | 2 Comments »
आज श्वासांनो भरा हुंकार एखादा तरी चेतवा राखेतुनी अंगार एखादा तरी कोठवर टिकणार कुंपण तत्त्व नियमांचे तुझे स्पर्श माझा वादळी ठरणार एखादा तरी साथ दे वा स्वप्न दे वा आठवांचा गाव दे दे जगायाला मला आधार एखादा तरी जीवनी झाले किती आरोह अन् अवरोहही काळजाला स्पर्शू दे गंधार एखादा तरी रिक्त हाताने कसा परतू तुला [...]

