नावे तिच्या स्मृतींचा सगळाच गाव झाला
कळले उभ्या जगाला का रंक राव झाला
मानू नको खरे तू सारेच खेळ माझे,
हरण्या असेल थोडा, माझा बनाव झाला
माझी तशी तिच्याशी निःशस्त्र भेट होती
नजरेतुनी परंतू भलताच घाव झाला.
आक्रोश आज केला माझ्यासवे नभाने
पाऊस, आसवांचा पण भेदभाव झाला
आता न यावयाचे जन्मा कधी फुलाच्या
सरणावरी कळ्यांचा आता ठराव झाला
दुःखे व्यथांसवे मी जुळवून घेतले पण
एका सुखी क्षणाला सगळा तणाव झाला
मी जाणलीच नाही, किंमत कधी स्वतःची
कळली मलाच जेव्हा, माझा लिलाव झाला
– अभिजीत दाते


mast aahe
By: abhijeet on सप्टेंबर 4, 2009
at 12:39 pm
” माझी तशी तिच्याशी निःशस्त्र भेट होती
नजरेतुनी परंतू भलताच घाव झाला. ”
………
” आक्रोश आज केला माझ्यासवे नभाने
पाऊस, आसवांचा पण भेदभाव झाला ”
………
आता न यावयाचे जन्मा कधी फुलाच्या
सरणावरी कळ्यांचा आता ठराव झाला
………
kuthalya kuthalya oli sangu. Sarvach kavita / gazal apratim aahe. you bang it 1ce again.
ya sundar kavitebaddal dhanyavaad. Lihit raha.
By: Sujit Balwadkar on सप्टेंबर 7, 2009
at 12:04 pm