Posted by: अभिजीत दाते | जानेवारी 5, 2009

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही..!

(अबू सालेम तुरुंगात त्याच्या साथीदाराला ऐकवतो)

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही..!
क्रिकेटला शारजाला पोचायचा दाऊदही..!

कळेना भारताला कराचीत की दुबईत तो,
कसा होता नि नव्हता व्हायचा दाऊदही..!

मधूनच जाग जेव्हा येई इंटरपोलला,
कशा जागा नव्या शोधायचा दाऊदही..!

कधी मर्डर, कधी मागायचा तो खंडणी.
कसे बाँबस्फ़ोटही घडवायचा दाऊदही..!

कशी भर पार्टीलाही आग माझी व्हायची,
जेव्हा मोनिकाला बिलगायचा दाऊदही..!

आता जेलामध्ये या फ़क्त आठवणी जुन्या.
कधी मरणे अशी ठरवायचा दाऊदही..!

– अभिजीत दाते

मूळ गीत -  तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
कवी           -  संदीप खरे

(संदीप खरे आणि त्याच्या तमाम पंख्यांनी आणि एसींनी क्षमा करावी)


प्रतिसाद

  1. मस्त विडंबन आहे.

  2. Good one, please keep writing !

  3. Very Good !

  4. Chhaan Chhaan.
    - Jayant

  5. मी प्रथम आपल्या ब्लॉगअवर आलोय आणि तिथेच रमलोय…

    तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही.. हे तर भन्नाट आहे..मिलिंद आरोलकर

  6. अहाहा! फारच छान विडंबन आहे!


Leave a response

Your response:

प्रवर्ग