दृष्टीस हिमनगाचा वरचाच बर्फ़ येथे.
करतात मग कशाला भलताच तर्क येथे..!
लाखात मोल ज्यांचे कवड्यात भाव झाले.
अर्थाशिवाय नसतो कुठलाच “अर्थ” येथे..!
निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले.
छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे..!
फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा,
नसतात फक्त भुंगे, वसतात “सर्प” येथे..!
अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही
लावायचा व्यथेचा हलकाच “वर्ख” येथे..!
– अभिजीत दाते

लाखात मोल ज्यांचे कवड्यात भाव झाले.
अर्थाशिवाय नसतो कुठलाच “अर्थ” येथे..!
ही फ़ार छान टोचणी आहे…
सूंदर गजल
अतिशय सुंदर..मोजक्या आणि सहज शब्दात “अर्थ” व्यक्त केला आहे..ह्या वर्खाची सवय नसलेल्या मधे मी पण आहे…
खरेच अतिशय सुंदर लिहीले आहेस!
KHUPACH CHAN !