
आज आमचं देशप्रेम खरंच सरलं आहे ..
स्वातंत्र्यदिनाला फक्त उपचार म्हणून उरलं आहे ..
त्या दिवशी झेंडा बाण्यात असतो .
देशभक्तीच्या गाण्यात असतो .
दुस-या दिवशी तोच कुठेतरी गटारातल्या पाण्यात असतो .
एका दिवसाची देशभक्ती तत्त्व आमचं ठरलं आहे ..
आज आमचं देशप्रेम खरंच सरलं आहे ..
स्वातंत्र्यदिनाला फक्त उपचार म्हणून उरलं आहे ..
अहिंसेचा ध्वज आम्ही मोठ्या डौलाने सांभाळतो .
पण शिवाजी, राणा प्रताप, राणी लक्ष्मीला का गुंडाळतो ?
अर्जुनाचं मन आमचं गीता मात्र विसरलं आहे .
आज आमचं देशप्रेम खरंच सरलं आहे ..
स्वातंत्र्यदिनाला फक्त उपचार म्हणून उरलं आहे ..
भगतसिंग इतकाच आमचा अशफ़ाकलाही सलाम असतो .
आमच्या देशाचा पहिला नागरिक कुणी अब्दुल कलाम असतो .
विद्वेषाचं विष तरीही आमच्या मनात भरलं आहे .
आज आमचं देशप्रेम खरंच सरलं आहे ..
स्वातंत्र्यदिनाला फक्त उपचार म्हणून उरलं आहे ..
आमच्या बुद्धीला, ज्ञानाला सा-या जगात मान आहे .
पण सरस्वती आमची लक्ष्मीकडे गहाण आहे .
पिझ्झा,बर्गर,कोला,पेप्सी आमच्या नसांत शिरलं आहे .
आज आमचं देशप्रेम खरंच सरलं आहे ..
स्वातंत्र्यदिनाला फक्त उपचार म्हणून उरलं आहे ..
प्रेम बंधुभाव सारं जरूर तुमच्या मनात ठेवा .
पण सीमेवरती पृथ्वी आणि अग्नी तैनात ठेवा .
देवानेही एका हातात पद्म दुस-या हातात शस्त्र धरलं आहे .
आज आमचं देशप्रेम खरंच सरलं आहे ..
स्वातंत्र्यदिनाला फक्त उपचार म्हणून उरलं आहे ..
आता तरी वज्रमूठ वळू दे…
भारतवर्ष पुन्हा उजळू दे…
उठा नव्याने जगाला कळू दे…
आज फ़ळे जी तुम्ही चाखता बीज आम्हीच पेरलं आहे ..!
- अभिजीत दाते


Sunder.wastaw warnan karatnahi paristhiti kashi paltel tyach samadhan hi dil aahe he wishesh. Satantrya dinachya Shubhechcha . Desh chya Surakshechi aaplya pratyeka war jababdari aahe. Kawita karach khoop chhan aahe
By: Asha Joglekar on ऑगस्ट 14, 2008
at 6:49 pm
Very Very Nice & I Love this Kavita.
I Also Love Shivaji Maharaj.
Thank You so much for this “SWATYANTRADIN” kavita.
Vibhavali.
By: Vibhavali on डिसेंबर 5, 2008
at 4:42 pm