एक तारा पेटुनी उठला पुरे..!
वीतभर काळोख विस्कटला पुरे..!
घोषणा, आंदोलने पुढचे पुढे,
भाषणाला येऊनी बसला पुरे..!
कायद्याचा खेळ आम्ही पाहिला
न्याय नाही लाभला; खटला पुरे..!
दर्शनांती देव नाही भेटला
राहिल्या शाबूत या “चपला” पुरे..!
वाहवा त्याला हवी तितकी मिळो.
दाद “एसेमेस”ची मजला पुरे..!
मी स्वतःचे रक्त का सांडू असे ?
हा जरासा हात खरचटला, पुरे..!
देव, देशास्तव समाजास्तव नको
तो स्वतःसाठी जरी लढला पुरे..!
जीवनाचा अर्थ कोणाला हवा ?
शेवटी आरंभ उलगडला, पुरे..!
– अभिजीत दाते

गझल फार छान आहे. नामंजूरही आवडली.
MAst
देव, देशास्तव समाजास्तव नको
तो स्वतःसाठी जरी लढला पुरे..!
shaljoditala…………. :O