Posted by: अभिजीत दाते | एप्रिल 10, 2008

डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..!

बरं झालं असतं “ओएसओ” जर बघितला नसता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..

डोळ्यांमधल्या अजब अदा राहून राहून छळतात.
दिलाचे पतंग आणि किती श्वासावरती जळतात.
जग सुनं सुनं होतं पिक्चर सरता सरता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..

युवराजसोबत फ़िरते ती अन ढोणीसोबत दिसते.
क्रिकेटमधले तिला सांगा नक्की किती कळते !
क्रिकेट,बॉलीवुड तेवढंच खरं बाकी गोंधळ नुसता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..

या जन्मी जर नाही जमलं पुढच्या जन्मी बघू.
आपण सुद्धा तेव्हा ओम कपूरसारखं जगू.
“दि एन्ड” नाही, पिक्चर अजून बाकी आहे दोस्ता,
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..!

– अभिजीत दाते


प्रतिसाद

  1. खूप मस्त


Leave a response

Your response:

प्रवर्ग