गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा..!
April 4, 2008 by Abhijeet
नूतन वर्षाभिनंदन..!
नमस्कार,
गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा..!
गुढीपाडव्याची आणखी एक आठवण म्हणजे मागच्या वर्षी याच दिवशी या ब्लॉगचा आरंभ झाला. एक गुढीच उभारली म्हणा ना..! सुदैवाने या उपक्रमाला नेहमीच्या आरंभशूरतेचं ग्रहण लागलं नाही. तुमच्या उमेद वाढवणार्या, प्रोत्साहन देणार्या प्रतिक्रिया दर वेळी नवीन पोस्ट टाकण्याचं बळ देत राहिल्या. आणि हा हा म्हणता वर्ष उलटलं. प्रत्येक नवीन पोस्ट टाकताना उत्साह आणि तुमच्या प्रतिक्रियांबद्दलचं कुतुहल अशा संमिश्र भावना मनात पिंगा घालत राहिल्या आणि पुढेही घालत राहतील. या निमित्ताने बर्याच नवीन ओळखी झाल्या. त्यांचे मार्गदर्शन आणि सुचनावजा प्रोत्साहन या भांडवलावरच या ब्लॉअची वाटचाल पुढे चालू राहिली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. जोवर हे असं मातृभाषाप्रेम शाबूत आहे तोवर मराठीला नामशेष होण्याची भीती नाही.
असंच बर्यापैकी लिखाण पुढेही माझ्या हातून घडो आणि तुमच्या सूचना, प्रतिक्रिया अशाच मिळत राहोत हीच सरस्वतीच्या चरणी प्रार्थना..!
जाता जाता एवढंच म्हणेन की…
“मी कुठे म्हटलं “माझी” कविता आहे !
तोच एक लिहीता आणि लिहविता आहे.
शब्द, छंद त्याच्याच लेखणीतूनच उतरून येतात,
रिताच मी अन कागदसुद्धा रिताच आहे..!
आपलाच,
अभिजीत
