“नामंजूर”… (रेल्वे प्रवाशाच्या नजरेतून)
April 2, 2008 by Abhijeet
जपत जीवाला ट्रेन सोडणे नामंजूर.
स्लो लोकलची वाट पहाणे नामंजूर.
मी मिळवावी जागा विंडोशेजारची,
दुसरी, तिसरी, चौथी जागा नामंजूर..!
कुपन हवे अन कार्ड हवे मज पास नको.
सुट्ट्या पैशाचाही मजला त्रास नको.
घड्याळ माझे तेच ज्या क्षणी ये गाडी,
मनगटावरी वेळ पाहणे नामंजूर..!
विदाऊट तिकिट जातो पाहून लाईन मी.
टि.सी. धरता मजला भरतो फ़ाईन मी.
प्रवासामध्ये होती हाडे चक्काचूर,
मज गर्दीचे थिटे बहाणे नामंजूर..!
धक्के, बुक्के भांडण तंटे लाख कळा,
लेडीज चढता डब्यात होतो घोटाळा.
रोख चापटी तिथेच द्यावी अन घ्यावी,
स्टेशनशी नेणे गार्हाणे नामंजूर..!
“मी लेट लोकलला शाप मानले नाही.
अन दार अडवणे पाप मानले नाही.
प्रवासी जेथे एकही चढला नाही,
स्टेशन असले मी अद्याप पाहिले नाही.”
विरार, पनवेल,खोपोली ती दूर बरी.
बोरिवली, वाशी, कल्याणची गोष्ट खरी.
सेंट्रल,हार्बर शिव्या घालणे मज समजे,
पण वेस्टर्नचा गर्व वाहणे नामंजूर..!
– अभिजीत दाते (मूळ कविता — “संदिप खरे”)

जियो, अभिजीत जियो! तू केलेले विडम्बन आम्हाला एकदन ’मंजूर’!
“मी लेट लोकलला शाप मानले नाही.
अन दार अडवणे पाप मानले नाही.
प्रवासी जेथे एकही चढला नाही,
स्टेशन असले मी अद्याप पाहिले नाही.”
sahi………………….