“डेट” एक काहिच्या काही गझल…!
April 1, 2008 by Abhijeet
सोडुनी द्या मामला हा सेट नाही.
मी तिच्या नजरेत तितका ग्रेट नाही.
वाट बघणे नेहमीचे काम होते
तीच उशिरा, मी कधीही लेट नाही.
ती म्हणाली जाऊ जोधा अकबराला.
पाहिला मी अजुन “जब वी मेट” नाही.
बॅंक बॅलन्स काय आहे काय सांगू,
दुसरा कुणी कवितेविना असेट नाही.
ती परी सुद्धा अता “इतिहास” झाली
खिन्न मी थोडा परी अपसेट नाही.
आडनावातून डी, ए, टी, ई तरिहि,
का मला स्वप्नात सुद्धा डेट नाही ?
– अभिजीत दाते
आवड्या आपुनको…
मस्तच….
हिईल रे डेट … डोंट व्हरी…. माझा आशिर्वाद आहे..
सहज सुन्दर