Posted in Uncategorized on April 17, 2008 | 1 Comment »
कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले.
दान दिले पण परताव्याचे योग ठेवले.
पाणी आता साधन झाले लढण्यासाठी,
पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले.
दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही.
रोज पार्वती अन तुलसीचे “सोप” ठेवले.
विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण,
छातीवरती तलवारीचे टोक ठेवले.
देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला.
गार्हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले.
चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली.
हिशोब होते मीही ऐसे “चोख” ठेवले..!
– [...]
Read Full Post »
Posted in Uncategorized on April 10, 2008 | 1 Comment »
बरं झालं असतं “ओएसओ” जर बघितला नसता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..
डोळ्यांमधल्या अजब अदा राहून राहून छळतात.
दिलाचे पतंग आणि किती श्वासावरती जळतात.
जग सुनं सुनं होतं पिक्चर सरता सरता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..
युवराजसोबत फ़िरते ती अन ढोणीसोबत दिसते.
क्रिकेटमधले तिला सांगा नक्की किती कळते !
क्रिकेट,बॉलीवुड तेवढंच खरं बाकी गोंधळ नुसता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..
या जन्मी [...]
Read Full Post »
Posted in Uncategorized on April 4, 2008 | No Comments »
नूतन वर्षाभिनंदन..!
नमस्कार,
गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा..!
गुढीपाडव्याची आणखी एक आठवण म्हणजे मागच्या वर्षी याच दिवशी या ब्लॉगचा आरंभ झाला. एक गुढीच उभारली म्हणा ना..! सुदैवाने या उपक्रमाला नेहमीच्या आरंभशूरतेचं ग्रहण लागलं नाही. तुमच्या उमेद वाढवणार्या, प्रोत्साहन देणार्या प्रतिक्रिया दर वेळी नवीन पोस्ट टाकण्याचं बळ देत राहिल्या. आणि हा हा म्हणता वर्ष उलटलं. प्रत्येक नवीन पोस्ट टाकताना [...]
Read Full Post »
Posted in Uncategorized on April 2, 2008 | 2 Comments »
जपत जीवाला ट्रेन सोडणे नामंजूर.
स्लो लोकलची वाट पहाणे नामंजूर.
मी मिळवावी जागा विंडोशेजारची,
दुसरी, तिसरी, चौथी जागा नामंजूर..!
कुपन हवे अन कार्ड हवे मज पास नको.
सुट्ट्या पैशाचाही मजला त्रास नको.
घड्याळ माझे तेच ज्या क्षणी ये गाडी,
मनगटावरी वेळ पाहणे नामंजूर..!
विदाऊट तिकिट जातो पाहून लाईन मी.
टि.सी. धरता मजला भरतो फ़ाईन मी.
प्रवासामध्ये होती हाडे चक्काचूर,
मज गर्दीचे थिटे बहाणे नामंजूर..!
धक्के, बुक्के भांडण [...]
Read Full Post »
Posted in Uncategorized on April 1, 2008 | 2 Comments »
सोडुनी द्या मामला हा सेट नाही.
मी तिच्या नजरेत तितका ग्रेट नाही.
वाट बघणे नेहमीचे काम होते
तीच उशिरा, मी कधीही लेट नाही.
ती म्हणाली जाऊ जोधा अकबराला.
पाहिला मी अजुन “जब वी मेट” नाही.
बॅंक बॅलन्स काय आहे काय सांगू,
दुसरा कुणी कवितेविना असेट नाही.
ती परी सुद्धा अता “इतिहास” झाली
खिन्न मी थोडा परी अपसेट नाही.
आडनावातून डी, ए, टी, ई तरिहि,
का मला [...]
Read Full Post »