कुंद या हवेत दाटलाय गारवा..
मऊ मऊ धुक्यावरील साय गारवा..
मऊ मऊ धुक्यावरील साय गारवा..
हे जळावरी धुके कशास दाटले,
रूप न्याहळीत गुंतलाय गारवा..
लोकरीत अंग सर्व झाकुनी बघा,
आज तो विचारतो कुठाय गारवा..
पांघरून शाल मी सुखात राहिलो
मज कुठे अजून झोंबलाय गारवा ?
रात चंद्रपावलात थांबली तिथे.
सोबतीस आज थांबलाय गारवा..
गारठून एकटे कशास जायचे ?
ये मिठीत बघ पळून जाय गारवा..!
– अभिजीत दाते

