Posted by: अभिजीत दाते | फेब्रुवारी 14, 2008

व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!

ठरवून असं एका दिवसात प्रेम होतं का सुरु ?
ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!

प्रेम असं कागदाच्या तुकड्यावर का मांडतात ?
प्रेम अगं सुगंधासारखं दाही दिशात सांडतात.
स्वच्छंद पाखरासारखं दोघं आभाळभर फिरु..
ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!

कोण म्हणतं या एकाच दिवशी प्रेम होतं व्यक्त ?
पापण्यांच्या पडद्याआड मग दुसरं काय दिसतं ?
सय आली की नकळत कसे डोळे लागतात झरु..
ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!

आपल्या आजाने केला होता का व्हॅलेंटाईन साजरा?
बाबानं दिला असेल आईला चाफ़्याचाच गजरा
जुनंच अगं अस्सल सोनं त्याचीच वाट धरु ..!
ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!

बाजीराव मस्तानीचे धागे व्हॅलेंटाईन शिवायच जुळले ना..
नल-दमयंती, दुष्यंत-शकुंतला एकमेकांचे झाले ना..
राधा कृष्णासारखे जगावेगळे प्रेमी ठरु..!
ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..!

–    अभिजीत दाते


प्रतिसाद

  1. too good, poem ti,me ani

  2. Hello,
    Mi tumhala Dada mhanu….chalel tumhala….!
    OK…..
    Dada….Tumhi “Dombivalikar” aani mi “Ambivalikar(Kalyan)”.

    kavita khupach chchan aahe…!
    Aaplya sanskrutichi jaan karun dyayala upayogi padel…!

    Mala marathi kavitancha sangrah karnyacha chchanda aahe…!
    Tumachi kavita mi sangrahi keli tar chalel ka tumhala….?
    Malya mazya E-mail ID (surajutekar88@gmail.com) var mail karun nakki kalava…!

    I’m waiting ur reply…!


Leave a response

Your response:

प्रवर्ग