Posted by: अभिजीत दाते | फेब्रुवारी 6, 2008

माझी प्रेमपत्रं..!

माझी प्रेमपत्रं म्हणजे तिच्या वडलांची रद्दी…
विडीकाडीपुरता सुटतो रुपया कधी कधी…

माझी प्रेमपत्रं म्हणजे तिच्या आईला टेंशन…
आमच्या वेळी असलं नव्हतं, काय हे नेक्स्ट जनरेशन…

माझ्या प्रेमपत्रांवर मग आजोबांचा नंबर
व्याकरण शुद्धलेखनाच्या निघतात चुका शंभर…

माझ्या प्रेमपत्रांवरती तिच्या आजीची पाळत…
आठवणीने त्यावर गच्चीत घालते पापड वाळत…

माझ्या प्रेमपत्रांमधल्या सुंदर ओळी ढापून,
तिची बहिण मासिकामधून आणते कविता छापून…

माझ्या प्रेमपत्रांसोबत शेवटी तिच्या भावाच्या खोड्या..
पाऊस साचल्या डबक्यामध्ये रोज गुलाबी होड्या..

माझी प्रेमपत्रं तीही वाचते केव्हातरी…
पत्ता बदलतो आणि जातात माझ्याच मित्राच्या घरी…!

–   अभिजीत दाते


प्रतिसाद

  1. Ekdam jhakaas kavita. Vachun maja ali. Baryach divasani evdhi fresh kavita vachali. Keep it up.

  2. it’s a wonderful .aaj pahilanda ya website la bhet dily tumacha kavita kharach khup chan ahet. asha kavita aankhi web site wer prashidha kara.keep it up.

  3. Mastch Ahe. Mood Fresh Zala.


Leave a response

Your response:

प्रवर्ग