Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for फेब्रुवारी, 2008

पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी, क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून, राजभैय्याची माणसं परवा गेली स्टॉलवर येऊन. गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जातील कशी, घरची मात्र वाचली. गाडी फ़ुटली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले. तिकिटासाठी म्हणून थोडे पैसे बाकी ठेवले. कारभारणीला घेऊन संगे, बघा आता [...]

Read Full Post »

बाकी आहे…!

सरला प्याला झिंग जराशी बाकी आहे. अजून थोडे दुःख स्वतःशी बाकी आहे. दिसतो जो मी केवळ वरचा तरंग आहे. माझे ‘मी’पण खोल तळाशी बाकी आहे. तुम्ही हव्या तर सुखे आठवा श्रावणधारा, हिशोब माझा जुना उन्हाशी बाकी आहे. नैवेद्याचा केला त्यांनी गाजावाजा, तेच जेवले; देव उपाशी बाकी आहे. हवी नको ती सुखे तुझ्यास्तव मागून झाली. अता [...]

Read Full Post »

ठरवून असं एका दिवसात प्रेम होतं का सुरु ? ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..! प्रेम असं कागदाच्या तुकड्यावर का मांडतात ? प्रेम अगं सुगंधासारखं दाही दिशात सांडतात. स्वच्छंद पाखरासारखं दोघं आभाळभर फिरु.. ऐक माझं व्हॅलेंटाईनचा हट्ट नको करु..! कोण म्हणतं या एकाच दिवशी प्रेम होतं व्यक्त ? पापण्यांच्या पडद्याआड मग दुसरं काय दिसतं ? [...]

Read Full Post »

माझी प्रेमपत्रं म्हणजे तिच्या वडलांची रद्दी… विडीकाडीपुरता सुटतो रुपया कधी कधी… माझी प्रेमपत्रं म्हणजे तिच्या आईला टेंशन… आमच्या वेळी असलं नव्हतं, काय हे नेक्स्ट जनरेशन… माझ्या प्रेमपत्रांवर मग आजोबांचा नंबर व्याकरण शुद्धलेखनाच्या निघतात चुका शंभर… माझ्या प्रेमपत्रांवरती तिच्या आजीची पाळत… आठवणीने त्यावर गच्चीत घालते पापड वाळत… माझ्या प्रेमपत्रांमधल्या सुंदर ओळी ढापून, तिची बहिण मासिकामधून आणते [...]

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.