तुझ्या घरावर कोसळणारा पाऊस माझ्याशी असं का वागतो ?
नुसतं बरसून जाण्यासाठी सुद्धा आसवांची व्हिजिटिंग फ़ी मागतो…
तुझ्या दाराशी रेंगाळणारा वारा माझ्याशी असं का वागतो ?
तुझ्या केसातला मोगराच त्याला नेहमी का लागतो ?
तुझ्या अंगणातला चंद्र माझ्याशी असं का वागतो ?
चांदण्याने जग न्हाताना माझ्या अंगणात काळोख दाटतो.
तुझ्या ओसरीवरचा कंदील तेवढा माझ्याशी ईमान राखतो.
रात संपेपर्यंत मी आणि वात संपेपर्यंत तो जागतो…
- अभिजीत दाते

