कमाई… एक गजल
December 14, 2007 by Abhijeet
कोकीळ का न गाई ?
केली कुणी मनाई..
सरला वसंत आणिक
उध्वस्त आमराई..
गोपाळ काल होते
झाले अता कसाई.
पापास भय कशाचे ?
पुण्याहुनी सवाई..
भावास भाव नाही
परकाच येथ “भाई”..
दारूत धुंद पोरे ,
अश्रूत चिंब आई .
आकाश हे तुझ्या की
डोळ्यातली निळाई!
निवडुंग राहिलो मी
अन तू फुलून जाई..
युद्धे नकोत आम्हा
जगणे इथे लढाई.
दिधला दुवा जगाने
“अभिजीत” ही कमाई..!
– अभिजीत दाते
Dear Abhijit,
Excellent ghazal………….
keep it up ……..
ya navvarshi ashach chhan kavita banav hich sadichha.
regards
Girish V Chaudhari