दिवाळीच्या काव्यशुभेच्छा….
November 7, 2007 by Abhijeet
दिवस येतात, दिवस जातात
सुखदु:खांची ओंजळ देउन हातात..
प्रकाश जीवनातला आटत जातो .
अंधार मात्र दाटत जातो .
पण कोपर्यात कुठेतरी
इवलासाच दिवा असतो .
त्याचा एक किरणसुद्धा
मग आपल्याला हवा असतो .
सत्कर्याचा असाच दिवा,
सद्भावाची अशीच पणती ,
जीवनमार्गावर धावत असता
तेवत राहो आपुल्या चित्ती..
पुन्हा घेऊ नवी भरारी ,
गत ते सारे तमासमान !
चला साजरी करू दिवाळी ,
सुरात गाउन प्रकाशगान..!
- अभिजीत दाते
