तुझी पावलं उमटली होती
किनार्याच्या मऊ पांढर्या रेतीवर .
स्वप्नांचे महाल होते,
शेजारी शेजारी कोरलेली दोन नावं,
आणि स्वतःच रेखाटलेली मर्यादेची रेषा !
पण काळाच्या लाटेत सारंच वाहून गेलं..
पुसट होत गेले हळूहळू सगळेच ठसे
जणू नव्हतेच कधी तिथे ते तसे !
लाटेचा इलाज नव्हता,
किनाराही हतबल होता.
आता बर्याच वर्षांनी तुझं भेटणं
पुन्हा त्याच किनार्याशी…
तशीच एक अवखळ लाट आली,
यावेळी तिचा अवखळपणा थोडा कमी झाल्यासारखा वाटतोय, नाही..!
बहुतेक किनार्यालाही उमगलंय,
वाळूवर उमटलेल्या ठशांनाही कधीतरी जावंच लागतं.
लाटेला तिचं देणं द्यावंच लागतं.
शिकलाय आता तो पाहायला तटस्थपणे,
पावलांकडे आणि लाटांकडेही..!
की तूच शिकली आहेस चालणं अलगदपणे
किनार्यावर आपली पावले उमटू न देता…!
– अभिजीत दाते


khupchhh chhannnn…!
he kavita wachnyasathi punha punha tuzya blog la bhet dyavi lagnar…..!
By: Deepti on ऑक्टोबर 16, 2007
at 8:10 सकाळी
Sundar….!!!
By: me ek bandu on ऑक्टोबर 30, 2007
at 9:09 सकाळी
Bhannat….. Mastach…
By: Sourabh on नोव्हेंबर 2, 2007
at 4:21 सकाळी