Feed on
Posts
Comments

Archive for October, 2007

थांबले पाऊल आता..
गाठले राऊळ आता..
स्वप्न सारे सत्य झाले
मन परी व्याकूळ आता..
का स्वतःच्या वेदनेतच
राहतो मश्गुल आता..
वाळवंटी थेंब नाही
मृगजळाची भूल आता..
पेलवेना साहवेना
ही व्यथेची झूल आता..
आयता मी नाग होतो
सोडले वारूळ आता..
अन तुझ्या छायेत आलो
दे तुझी चाहूल आता..
लावितो थोडी कपाळी
पावलांची धूळ आता..
होऊ दे निर्माल्य चरणी
या तनूचे फ़ूल आता..!
–  अभिजीत दाते

Read Full Post »

मनाच्या डोहात खोल खोल तुझ्या आठवणी…
रानातून वाहता ओहोळ तुझ्या आठवणी…
फ़ेर धरतात चांदण्यात तुझ्या आठवणी…
सावली धरतात उन्हात तुझ्या आठवणी…
स्वप्नामधला वावर तुझ्या आठवणी…
मोरपीस जसे अंगावर तुझ्या आठवणी…
तुझ्याइतक्याच हळव्या तुझ्या आठवणी…
राहून राहून छळव्या तुझ्या आठवणी…
करतात भावविव्हल तुझ्या आठवणी…
तरीही राहू देत जवळ तुझ्या आठवणी…
माझ्या प्रीतीचं इमान, तुझ्या आठवणी…
तू नाहीस… किमान तुझ्या आठवणी…!
–   अभिजीत दाते

Read Full Post »

तुझी पावलं उमटली होती
किनार्‍याच्या मऊ पांढर्‍या रेतीवर .
स्वप्नांचे महाल होते ,
शेजारी शेजारी कोरलेली दोन नावं ,
आणि स्वतःच रेखाटलेली मर्यादेची रेषा !
पण काळाच्या लाटेत सारंच वाहून गेलं..
पुसट होत गेले हळूहळू सगळेच ठसे
जणू नव्हतेच कधी तिथे ते तसे !
लाटेचा इलाज नव्हता ,
किनाराही हतबल होता .
आता बर्‍याच वर्षांनी तुझं भेटणं
पुन्हा त्याच किनार्‍याशी…
तशीच एक अवखळ लाट आली ,
यावेळी तिचा [...]

Read Full Post »

स्वप्न….

स्वप्न….
कधी नुसतंच रंजन असतं.
कधी काळजाचं स्पंदन असतं.
पण कसंही असलं तरी
ते जगण्याचं इंधन असतं..!
विचारांच्या जलधारेला
कल्पकतेचा स्पर्श जणू…
मनक्षितीजावर ये आकारा
स्वप्नांची इंद्रधनु..
इच्छा आकांक्षांच्या प्रवाहाला
स्वप्नं हक्काचा काठ देतात .
आणि मार्ग खुंटले म्हणजे
स्वप्नंच नवी वाट देतात .
काही स्वप्नं स्वप्नंच राहतात
तरी आयुष्यभर पुरतात .
पुढच्या पिढीसाठी मागे
वारसा म्हणुन उरतात .
कालचं स्वप्नं, आजचं वास्तव
आजचं स्वप्नं , उद्याचं सत्य
वास्तवाइतकंच म्हणून सांगतो
स्वप्नातसुद्धा आहे तथ्य..
कारण…
दिवस नसला [...]

Read Full Post »

शब्द भिजलेले तुझ्या अधराशी
बोल काही माझ्यासवे, थांब ना जराशी..!
खिडकीशी घुटमळे, मन सांजवारा
सळसळ पडद्याची कानी ये जराशी..!
निःशब्दाची लय वाहे जीवघेणी
ओलेती पापणी लवते डोळ्याशी..!
ओंजळीत तुझा शब्द शब्द घ्यावा
आणि निखळावा ताराही आकाशी..!
हात चांदण्याचे तुझे हाती यावे
हळुवार व्हावे स्पर्श मोरपिशी..!
त्या एका क्षणात आयुष्य सरावे
आणि जन्मा यावे पुन्हा तुझ्या देशी..!
थांब स्वप्न माझे सरू दे एवढे
सुरू होती पुढे दुनियेच्या वेशी..!
तिथे नियतीचा [...]

Read Full Post »