Posted by: अभिजीत दाते | जून 14, 2007

पाऊस दाटून आल्यावर…

पाऊस दाटून आल्यावर
मीही चातक बनून पाहतो..
आपल्या वाट्याला येणार्‍या
थेंबांचा हिशेब करून पाहतो..

पाऊस दाटून आल्यावर
आभाळ डोळे भरुन बघतो..
पाण्यात पुन्हा पाणी सामावताना
कोरड्या किनार्‍यावरून बघतो..

पाऊस दाटून आल्यावर
उघडून घेतो मनाची दारे..
आणि भरून घेतो श्वासात
नव्या ऋतुचे नवीन वारे..

पाऊस दाटून आल्यावर
तुझाही विसर पडतो थोडा वेळ..
गुंग होऊन बघत राहतो
बुडत्या तरत्या नावांचा खेळ..

पाऊस दाटून आल्यावर
आठवतातच ते ओले क्षण..
टपरीवरची चहा भजी
एकाच छत्रीत भिजलेले दोघे जण..

पाऊस दाटून आल्यावर
तनासोबत मनालाही भिजवून घेतो
थोडे माझे , थोडे तुझे
सगळेच वणवे विझवून घेतो..!

–   अभिजीत दाते


Leave a response

Your response:

प्रवर्ग