
१० मे २००७ . स्वतंत्र भारत देशात श्वास घेणार्या आपल्या जनतेपैकी फ़ार कमी लोकांना हे ठाऊक असेल की आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्याचा पाया दीडशे वर्शांपूर्वी या दिवशी घातला गेला . “शिपायांचे बंड” म्हणून इंग्रजांनी हेटाळलेल्या , पण पुढे “हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्यसमर” म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गौरविलेल्या एका लढ्याची रणदुंदुभी मेरठ येथे याच दिवशी फ़ुंकली गेली . मंगल पांडे नावाच्या ठिणगीने उठलेल्या या आगीने पाहता पाहता वणव्याचे रूप धारण केले आणि इंग्रजी राज्य भस्मसात होऊन जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती . ही आग शमवण्यात इंग्रजांना यश आलं असलं तरी याच आगीतून पुढे क्रांतीचे निखारे फ़ुलले . झाशीची रणचंडी राणी लक्ष्मीबाई , श्रीमंत नानासाहेब पेशवे , बहादूरशहा जफ़र, अवधची बेगम हजरतमल , कुंवरसिंग, रंगो बापूजी आणि सेनापती तात्या टोपे अशी अनेक तेजस्वी ज्वाळा या वणव्यातून उठल्या आणि पुढे अनेक अनाम वीरांनादेशकार्यासाठी प्रेरणास्त्रोत बनून गेल्या .
केवळ अपयशी ठरला म्हणून या उठावाचे महत्त्व कमी होत नाही . हिंदु मुस्लिम ऐक्याचे आगळे दर्शन या निमित्ताने घडले . दुर्दैवाने आपण ते टिकवू शकलो नाही . आज या घटकेला त्याची निकडीची गरज निर्माण झाली आहे . या लढ्याची आणि त्यातल्या लढवय्यांची जेवढी दखल खुद्द इंग्रजांनी घेतली , तितकी आपल्याला कधी घ्यावीशी वाटली नाही . याचा अर्थ आपण या वीरांना विसरलेलो आहोत असा नाही . स्मारकं उभारून आणि चौक, रस्ते इत्यादींना नावे देऊन त्यांची स्मृती केवळ कागदावरच किंवा भाषणापुरतीच कशी राहिल याची पुरेपुर काळजी सत्ताधार्यांनी घेतलेली आहे . म्हणूनच राणी लक्ष्मीचे गोडवे गाणार्या समाजात स्त्री भ्रूणहत्या सर्रास घडताना दिसतात . “पुराणातली वांगी पुराणात” तद्वत “इतिहासातली वांगी इतिहासात” असंच चित्रदिसतं . शिवाजी आणि लक्ष्मी जरूर जन्मावेत पण शेजारी अशी आपली मनोवृत्ती झालेली आहे . या पार्श्वभूमीवर १८५७ च्या वीरांचे स्मरण न करणे हा करंटेपणा ठरेल . हा उठाव चेतवला तो कुणा राजा रजवाड्याने नव्हे , तर मंगल पांडे , एका साध्या शिपायाने . थोडक्यात सामान्यातूनच अशा असामान्य पर्वाचा आरंभ होतो हे वास्तवनक्कीच प्रेरणादायी आहे .
या स्वातंत्र्ययुद्धातला एक काळजाला चटका लावणारा पण तितकाच बाणेदार प्रसंग असा…
या स्वातंत्र्ययुद्धातला चिरडण्यात ब्रिटिशांना यश आल्यावर कैदेत असलेल्या शेवटच्या बादशहाला, बहादूरशहा जफ़रला त्याचे हुजरे कुचेष्टेने एक तबक पेश करतात . त्यावरचे मखमली आच्छादन बाजूला केल्यावर बादशहाला आपल्या दोन पुत्रांची मस्तके दिसतात . हुजरे जफ़रला म्हणतात की हिंदुस्थानची तलवार आता शांत झाली आहे . त्यावर त्या बहादूरशहाने त्या प्रसगातही धीरोदात्तप असे उद्गार काढले की ,
“वादीयों मे लू रहेगी जब तलक ईमान की
दिल्ली क्या लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की..!”
आज वादीयां तशाच आहेत , तेग सुद्धा आहे . पण देशाभिमानची झुळुक वाहत नाही ही आमची शोकांतिका..!
“जय हिंद”
– अभिजीत दाते


Please find enclosed.
नमस्कार !!
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराला उजाळा “स्वातंत्र्यसमर १८५७ चा” http://swatantrasamar1857cha.blogspot.com/,
त्यात तुम्हाला बघायला मिळेल दुर्मिळ चित्र आणि त्यांची संक्षिप्त माहीती – १८५७ च्या समराला सुरुवात करणारे विवादीत काडतुस, बंडात वापरलेली पी-५३ रायफल, मंगल पांडेंच्या फाशीचा हुकुमनामा, समरातील काही आठवणी – क्रुरपणे दिली जाणारी फाशी, काश्मिरगेट वरील रणसंग्रांम (दिल्ली), बराखपुर येथील छावणी, शिपायांची कैद, तोफेच्या तोंडी सैनिक, लखनव येथील इंग्रजावर हल्ला, इंग्रज अधिकारी हॅवलॉक यांनी केलेली कत्तल, मंगल पांडे, तात्या टोपे, बहादुरशाह जफर, बेगम हज्ररत महल, कुंवरसिंह, नाना साहेब, राणाबेनी माधवसिंह, १८५७ काळातील इंग्रज अधिकारी – ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरीया, गर्व्हर्णल जनरल भारत, हेंन्री हॅवलॉक, झाशीच्या राणीचे पत्र, समरातील योध्यांवरील टपाल टिकीटे, ब्रिटीशांची शौर्य पद्क, १८५७ काळातील महत्वपुर्ण नकाशे , १८५७ च्या कालखंडातील चलन, १८५७ सालातील घटनाक्रम इ.
तर मग तुम्ही जरुर भेट द्या, आणि तुमचा अभिप्राय ब्लॉग वर द्या !!
प्रशांत – नाशिक
कदाचित आपण अजुनही तो उठाव म्हणजे एक बंड होते आणि अपराधी सैनिकांना तशी कठोर शिक्षा देणे योग्यच होते असे मानाल,
पण आम्ही भारतीय लोक ते केवळ शिपायांचे बंड होते असे मानत नाही, आम्ही ते आमचे पहिले राष्ट्रीय स्वातंत्र्यसमर मानतो.
-स्वामी विवेकानंद-