देऊ नकोस हाक, झाला आता उशीर
आधी कधीच नव्हती माझी तुला फ़िकीर…
उध्वस्त गाव झाला, ज्वाळा तुझ्याच होत्या
आक्रोश ऐकताना होतीस तू बधीर…
आता कशास आला दाटून हा उमाळा
खोटेच सर्व आहे डोळ्यातलेही नीर…
होतो पियुष जेव्हा, ओठी न लावीले तू
आता विषास प्याया झालीस तू अधीर…
फ़ुलवु शकेल आता असला वसंत नाही
सारी गीते विराण्या, सारे ऋतु शिशीर…
आहे निघून गेला आत्मा कधीच माझा,
आत चितेत फ़क्त जाळायचे शरीर…
– अभिजीत दाते


Kavita Avadali!
By: Ranjeet on मे 18, 2007
at 8:32 pm
Khup….Khup…..Khup chan aahe.
By: Alesh on मे 24, 2007
at 10:35 सकाळी