”केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली” किंवा “सुन्या सुन्या मैफ़लीत माझ्या” सारख्या गज़लांनी आपल्या मनावर आजतागायत गारूड केलेलं आहे. माधव ज्युलियनांनी मराठीत लावलेलं हे गज़लेचं रोपटं पुढे अनिल, पाटणकर आणि अर्थातच सुरेश भट यांच्यामुळे फ़ोफ़ावलं. याच गज़लेला आणखी एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी तिला महाजालाचं दालन खुलं करुन दिलंय प्रसाद शिरगावकर आणि वैभव जोशी यांनी.
गज़ल कशी लिहावी यावर मार्गदर्शनापासून ते पोस्ट झालेल्या रचनांवर चर्चा अशा विविधांगाने हे संकेतस्थळ सजलं आहे. सोबत “गज़लेची बाराखडी” हे भटांचं विवेचन आहेच. मग कधी भेट देताय मराठीगज़ल.कॉमला ? मराठी गज़लेला तुमची दाद हवी आहे..!

