काही दिवसांपूर्वी मायबोली वर सहज चक्कर टाकली आणि गज़ल कार्यशाळेची लिंक दिसली . कुतुहल म्हणून अधिक माहितीसाठी लिंक वाचली . श्री. वैभव जोशी यांनी गज़ल या सुंदर पण थोड्या क्लिष्ट वाटणार्या अशा काव्यप्रकारची सर्वांना ओळख व्हावी या हेतुने हा घाट घातला होता .
गज़ल म्हटलं की सुरेश भटांचं नाव आपोआपच निघतं . हा काव्यप्रकार मरठीत खर्या अर्थाने रूजवण्याचं श्रेय हे त्यांचंच . शिवाय त्यांची गज़ल परकी वाटत नाही तर याच मातीतली आपलीशी अशी वाटते . तिचं जतन व्हावं आणि ती वाढीस लागवी म्हणून सोप्या अशा भाषेत गज़लेचं व्याकरण आणि सौंदर्य उलगडून दाखवण्याच प्रयत्न केला गेला . त्या लेखातून रदीफ़ ( अंत्ययमक ) , काफ़िया ( यमक ) , अलामत ( स्वरचिन्ह ) इत्यादी गज़लेच्या कल्पनांचा परिचय झाला . मग जोशी गुरूजींनी दिलेल्या मिसर्यावर आधारित गज़ल लिहिण्याची धडपड सुरू झाली . वृत्तात लिहिण्याची सवय नसल्याने थोडंसं अवघड होतं . पण अखेरीस गज़ल लिहून पूर्ण झालीच . त्यानंतर काही दिवसांनी खुद्द जोशी साहेबांचा फ़ोन आला आणि त्यांनी काही सुचना केल्या . त्याबरहुकुम थोडेसे बदल केले आणि ही गज़ल आकाराला आली . पहिलाच प्रयत्न होता त्यामानाने बर्यापैकी जमली असं मानायला हरकत नाही .
ऋतू येत होते ऋतू जात होते…
मला जे हवे तेच अज्ञात होते…
जुन्या वादळांनी पुन्हा घोंघवावे…
असे काय आव्हान स्पर्शात होते…
प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली
जशी वीज ऊध्वस्त दर्यात होते…
झुरावे कशाला तुझ्या आठवाने…
उगा आसवांचे बळी जात होते…
तुला का न माझे इरादे कळाले…
इशार्यात होते शहार्यात होते…
नको आणखी घाव देऊस आता…
जुन्याचेच देणे मला खात होते…
– अभिजीत दाते
(मायबोलीवरील वाचकांच्या प्रतिक्रिया इथे वाचा…)
हा निर्दोषपणा भविष्यातही असाच जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन हे नक्की . पण तरीही एखादी गोष्ट पहिल्यांदा करण्याचा आनंद काही वेगळाच , नाही का…!


Dats ,
Goood, Blog chaaan aaahe….
I am proud of that ki mala tuzya blog var pahilyaanda comment post karaycha maan milala
By: Shailesh on मार्च 26, 2007
at 9:03 सकाळी
bhari jamali aahe
pahilach prayatna mhanun khup changala aahe
pan tuze nehamiche shabdanche je surekh khel asatat je
mala kavita vachatana anand detat
te hyachya disat nahit
pan kharach changali jamali aahe
By: ajinkya on मार्च 26, 2007
at 9:22 सकाळी
Hi Abhi,
Kon re evde mote nav mhanar. Sorry, tuzya navchya shortform baddal.
By d way mast gazal. Malahi Suresh Bhat yanchya gazal khup avdtat.
Like
Purtata mazya vyathechi maziya mrutyut vhavi,
Jivnapasun mazya hya mala mukti milavi……
…………
ani shevatchi line mhanze altimate
kay sangave tula me? kay mi bolu tuzyashi?
Rakh zhalyvari gite tula mazi smaravi………….
Vey nice
Have a good day
By: vaishali on एप्रिल 28, 2008
at 6:20 pm
शेर न् शेर आवडला…
तिसर्या शेरात आपल्याला दर्या ऐवजी दर्या म्हणायचंय का?
आल्हाद
By: आल्हाद alias Alhad on जून 9, 2009
at 10:09 सकाळी