Posted by: अभिजीत दाते | मार्च 22, 2007

Shubharambha Aarambh To Nirgunacha..!

Navarsha_Shubhechhaa

दिवस नवे वर्ष नवे.

 सौख्य नवे अन् हर्ष नवे.

झेप नवी अन् ध्येय नवे.

 गाठूया उत्कर्ष नवे..

तीच मृदा परि बीज नवे.

तीच दिशा पण क्षितिज नवे..

 नवे पंख अन नवी भरारी..

जीवनात ये नवी उभारी..

विसरुन जाऊ सारी कटुता..

उरात घेऊ भरुन गोडवा..

वसंतासवे करु साजरा ,

एकमुखाने चैत्र पाडवा..

– अभिजीत दाते


Leave a response

Your response:

प्रवर्ग